'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'
आज 6 डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन.
एका अशा महामानवाचा स्मृतिदिन, ज्यांनी एकाकी संघर्ष करून केवळ स्वतःचं आयुष्य नाही, तर तमाम दीन-दलितांचं आणि स्त्रियांचं आयुष्य बदलून टाकलं. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ हक्क दिले नाहीत, तर 'मी माणूस आहे' या आत्मसन्मानाची जाणीव करून दिली.
अंधारात चाचपडणाऱ्या पिढ्यांना ज्ञानाची मशाल हाती देऊन त्यांनी प्रकाशाच्या दिशेने चालण्यास शिकवलं. संविधानरुपी एका मजबूत आधारस्तंभावर त्यांनी या देशाला उभं केलं.
आज त्यांच्या स्मृतीला विनम्र वंदन करताना, आपण त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया. कारण विचारांनीच क्रांती होते!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे!
🙏 जय भीम, जय संविधान 🙏
#MahaparinirvanDin
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#भारतीयसंविधान
#SixDecember
#बाबासाहेब_अमर_रहे
#जयभीम
#FreedomEqualityFraternity
#EqualityForAll
#शिक्षणहक्क
#6December
#चैत्यभूमी
#Chaiyabhumi
#mpsc
#Ambedkarite
#दलितपँथर
#BhimraoAmbedkar